Ad will apear here
Next
से चीज : दंत, मौखिक आरोग्याविषयीच्या डॉ. भक्ती दातार यांच्या पुस्तकाचे आठ मार्चला प्रकाशन


पुणे :
माणसाचा चेहरा प्रसन्न असला, की समोरच्यावर प्रभाव पाडण्याचे अर्धे-अधिक काम होऊन जाते. ही प्रसन्नता मनावर अवलंबून असते हे खरेच; पण बाह्य सौंदर्याचा विचार करायचा झाल्यास या प्रसन्नतेत सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतात ते सुंदर दात. दात सुंदर आणि निरोगी राखण्यासाठी, तसेच संपूर्ण मौखिक आरोग्यच चांगले राखण्यासाठी काय काळजी घेणे आवश्यक आहे, याची माहिती देणारे इंग्रजी पुस्तक पुण्यातील डॉ. भक्ती दातार यांनी लिहिले आहे. ‘से चीज’ असे त्या पुस्तकाचे नाव असून, बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे ते प्रकाशित होत आहे. आठ मार्च रोजी सायंकाळी पुण्यात त्याचा प्रकाशन सोहळा होणार आहे.

डॉ. भक्ती दातार या सामाजिक व प्रतिबंधात्मक दंत आरोग्य या विषयासह दंतशल्यचिकित्सेच्या तज्ज्ञ आहेत. सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी मौखिक आरोग्यासंदर्भातील जागृती करण्याच्या हेतूने त्यांनी ‘से चीज’ हे पुस्तक लिहिले आहे. तसेच, दंत आणि मौखिक आरोग्यात बाधा आणणाऱ्या गोष्टींना प्रतिबंध करण्यासंदर्भातील मार्गदर्शनही त्यांनी या पुस्तकात केले आहे. 

ज्येष्ठ ओरल-मॅक्सिलो फेशियल सर्जन डॉ. दीपक कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैजयंती खानविलकर कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. जयंत नवरंगे आणि डॉ. विजय फडके यांचीही विशेष उपस्थिती या वेळी असेल. या पुस्तकाच्या ई-बुकचेही अनावरण या कार्यक्रमात होणार आहे. रविवारी, आठ मार्च २०२० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता टिळक रोडवरील डॉ. नितू मांडके आयएमए हाउसमधील डॉ. संचेती सभागृहात हा सोहळा होणार आहे. 

या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ‘बुकगंगा’चे संस्थापक मंदार जोगळेकर, संचालिका सुप्रिया लिमये, तसेच लेखिका डॉ. भक्ती दातार आणि डॉ. समीर दातार यांनी केले आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZXZCK
Similar Posts
डॉ. भक्ती दातार यांच्या ‘से चीज..!’ या पुस्तकाचे प्रकाशन; दंत, मुख आरोग्याचे सर्वंकष मार्गदर्शन .पुणे : ओठ, जीभ, दात, जबडा यांचे आरोग्य शारीरिक व मानसिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असते, हे लक्षात घेऊन प्रसिद्ध दंतशल्यचिकित्सातज्ज्ञ डॉ. भक्ती दातार यांनी लिहिलेल्या ‘से चीज..!’ या इंग्रजी पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन महिला दिनी पुण्यात करण्यात आले. पुरुष व मुले यांच्याबरोबरच विविध वयोगटातील महिलांच्या
‘असंच होतं ना तुलाही’च्या दुसऱ्या आवृत्तीचे २३ जानेवारीला पुण्यात प्रकाशन पुणे : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्याचा परिणाम पुस्तकांच्या विक्रीवरही झालाय. त्यातही कवितासंग्रह विकत घेऊन वाचण्याचे प्रमाण तर अगदीच कमी आहे... अशी आणि अशा आशयाची वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात. काही प्रमाणात ती खरीही आहेत. मिलिंद जोशी यांच्या ‘असंच होतं ना
आयुष्यातील समस्यांची उकल शोधणे हाच अध्यात्म मार्ग पुणे : ‘प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या आहेतच. त्या कुणालाही चुकलेल्या नाहीत. आपला जन्म कशासाठी झाला असा प्रश्न अनेकांना पडतो, तर त्याचे उत्तर ‘या समस्या सोडवण्यासाठीच’ असे आहे. समस्या संपल्या की जन्मच संपला. या प्रश्नांची उत्तरे शोधणे किंवा समस्यांची उकल शोधणे हेच खरे अध्यात्म आहे. गहन रूप असलेले अध्यात्म
प्रसाद शिरगांवकरांचे लेखन सखोल आणि विचार करायला लावणारे पुणे : ‘कोणतेही लेखन माणसाला विचार करायला प्रवृत्त करत असेल तर ते कालातीत होते. तसेच लेखन वाचकांना आवडते. प्रसाद शिरगांवकर यांनी लिहिलेल्या तिन्ही पुस्तकांमधील लेखन हे विचार करायला प्रवृत्त करणारे आहे. प्रसाद फेसबुकवर लिहितो, तरीही हे लेखन खूपच सखोल आहे हे पाहून खूप छान वाटले,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ आयटीतज्ज्ञ व अर्थतज्ज्ञ डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language